'या' जन्मतारखेचे लोक असतात खूप भाग्यवान, धैर्यवान; तुमचा मूलांक आहे का यात?
अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व तसेच, त्याच्या जन्मतारखेच्या आधारे त्याच्या भविष्याविषयी माहिती देतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंकशास्त्राद्वारे तज्ज्ञ व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित भविष्यातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल माहिती देतात.
अंकशास्त्रात, मूलांक आणि भाग्यांक व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे काढली जाते. राशींप्रमाणेच, प्रत्येक मूलांक देखील कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतो.
धार्मिक तज्ज्ञांच्या मते, काही तारखांना जन्मलेले लोक खूप भाग्यवान तसेच धैर्यवान असतात.
मूलांक-1 : कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. या मूलांकाच्या व्यक्तीमध्ये नेतृत्वगुण असतात. त्यांच्या याच गुणांमुळे ते कठीणातलं कठीण कामही सहज करू शकतात.
मूलांक-3 : कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 आहे, ज्यांचा स्वामी बुध आहे. मूलांक 3 असलेले लोक स्वाभिमानी असतात.
मूलांक-5 : 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. हे धाडसी स्वभावाचे लोक त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात.
मूलांक-9 : 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 9 असतो. या मूलांकाचे लोक साहसी, धाडसी आणि भावनिक असतात.
(टिप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून सांगत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)