Chennai Super Kings: धोनीनं घेतली ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 'द एलिफंट विस्परर्स' च्या टीमची भेट; पाहा फोटो
क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) नुकतीच ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) च्या टीमची भेट घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीची दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस,या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि बेली यांची भेट महेंद्र सिंह धोनीनं घेतली.
महेंद्र सिंह धोनी आणि 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीच्या टीमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
टीम चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम अकाऊंवर एम.एस. धोनी आणि 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीच्या टीमचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये धोनी हा 'द एलिफंट व्हिस्पर्स' च्या टीमचे स्वागत करताना दिसत आहेत.
धोनीनं 'द एलिफंट विस्परर्स' च्या टीमला चेन्नई सुपर किंग्सची जर्सी गिफ्ट म्हणून दिली.
धोनीची मुलगी झिवानं देखील द एलिफंट विस्परर्सच्या टीमची भेट घेतली.
'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्री दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विसनं यावेळी ऑस्करची ट्रॉफी देखील सोबत आणली होती.
'द एलिफंट विस्परर्स' ही ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 40 मिनिटांची आहे.