Temperature : देशात तापमान वाढलं, तर काही भागात पावसाचा इशारा
या महिन्याच्या सुरुवातीला देशातील काही राज्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) चांगलीच हजेरी लावली. त्यामुळं थंडी जाणवत होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसात देशातील अनेक राज्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच वाढला आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश राज्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे
येत्या काही दिवसात तापमानात तीन ते चार अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
काही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
चक्रीवादळामुळे त्रिपुरा आणि मिझोराममध्ये शनिवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय रविवारी नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आणि वादळाची शक्यता आहे. यादरम्यान, जैसलमेर, बिकानेर आणि आसपासच्या भागात कमाल तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस नोंदवले जाऊ शकते.
दिल्लीत आज कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे
उत्तर प्रदेशातही सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. तिथे उष्ण वारे वाहत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.