Most Profitable Films of 2024: 'या' यादीमुळे बॉलिवूड फिल्म्सची पोलखोल; फक्त 2 हिंदी चित्रपटांनीच मिळवलं स्थान
2024 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या या यादीत बॉलीवूड चित्रपट पहिल्या क्रमांकावर असले तरी बनत असलेल्या शेकडो चित्रपटांपैकी केवळ दोनच हिंदी चित्रपटांचा या यादीत स्थान मिळवता आलं आहे. या यादीत प्रथम क्रमांकापासून ते दहाव्या क्रमांकापर्यंत प्रत्येक भाषेतील कोणत्या चित्रपटांनी आपलं स्थान निर्माण केलं? ते सविस्तर पाहुयात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवव्या क्रमांकावर मुंज्या हा बॉलिवूडपट आहे, ज्यानं 260 टक्क्यांचा नफा कमावला आहे. या यादीत स्थान मिळवणारा हा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे.
या यादीत बॉलीवूड चित्रपट स्त्री 2 पहिल्या क्रमांकावर आहे, ज्यानं 945.83 टक्क्यांचा नफा कमावला आहे.
दुसऱ्या स्थानावर मल्याळम चित्रपट प्रेमालू आहे, ज्यानं 745.5 टक्के नफा कमावला आहे.
या यादीत तमिळ चित्रपट लब्बर पांधू तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यानं 652 नफा कमावला आहे. चौथ्या क्रमांकावर मल्याळम चित्रपट मंजुम्मल बॉईज आहे, ज्यानं 610 टक्के नफा कमावला आहे. तसेच पाचव्या स्थानावर मल्याळमची किष्किंधा कांडम आहे, ज्यानं बजेटच्या 493.5 टक्के नफा कमावला आहे.
तामिळ सिनेमाच्या Vaazhai नं 482.5 टक्के नफ्यासह यादीत सहावं स्थान पटकावलं आहे. दरम्यान, मल्याळमच्या वाझानं 369.2 टक्के नफा मिळवून सातव्या स्थानावर आपलं स्थान निश्चित केलं आहे. तेलुगू चित्रपट पुष्पा 2, जो सध्या सिनेमागृहांमध्ये आठव्या स्थानावर आहे, त्यानं आतापर्यंत 299.10 टक्के नफा कमावला आहे.
या यादीत 10 व्या क्रमांकावर विजय सेतुपतीचा तामिळ चित्रपट 'महाराजा' आहे, ज्याने 256.5 टक्के नफा कमावला आहे.