विदेशात जन्म, आठव्या वर्षी अभिनय, लाखो 'दिलों की धडकन' असलेल्या दीपिका पादुकोनची 'ही' पाच गुपितं माहिती आहेत का?
दीपिका पादुकोन ही एक आघाडीची अभिनेत्री आहे. आज तिचा वाडदिवस असून ती 39 वर्षांची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर तिच्याबाबतीत कोणालाही माहिती नसलेल्या पाच गोष्टी जाणून घेऊ या....
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपिका पांदुकोनचे शिक्षण बंगळुरू शहरात झालेले आह. मात्र तिचा जन्म विदेशात झालेला आहे. ती डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन शहरात झालेला आहे. त्यानंतर 11 महिन्यांची झाल्यानंतर तिचे आईवडील भारतात परतले होते.
दीपिका पादुकनोने 8 वर्षांची असतानाच अभिनय केलेला आहे. तिने एका जाहिरातीत काम केले होते.
दीपिका पादुकोन ही अभिनेत्री अनेकांना ओम शांती ओम या चित्रपटापासून माहिती झाली. मात्र तिचा पहिला चित्रपट हा नव्हता. तिने ऐश्वर्या या कन्नड चित्रपटात काम केले होते.
एकाच वर्षात 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या चार चित्रपटांत या अभिनेत्रीने काम केलेले आहे. तिचे 2013 साली रेस-2, ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्स्प्रेस, गोलियों की रासलीला- रामलिला या चारही चित्रपटांनी 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.
दीपिका पादुकोनचे वडील हे बॅडमिंटनचे नॅशनल प्लेयर आहेत. तसेच त्यांना अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांना पद्मश्री हा पुरस्कारदेखील मिळालेला आहे. वडिलांप्रमाणेच दीपिका पादुकोनदेखील बॅडमिंटनची नॅशनल प्लेयर आहे.
हुरुन रिच लिस्ट 2024 नुसार दीपिका पादुकोन ही बॉलिवुडमधील पाचवी सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री आहे. तिची संपत्ती 500 कोटी रुपये आहे, असे म्हटले जाते.
दीपिका पादुकोन
दीपिका पादुकोन