Monalisa : एकेकाळी कमवायची फक्त 120 रुपये, आता आहे कोट्यवधींची मालकीन, मोनालिसाची प्रॉपर्टी किती?
भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय स्टार्समध्ये अभिनेत्री मोनालिसाचे नाव सर्वात वरती आहे. भोजपुरी सिनेमात काम करण्यासोबतच मोनालिसाने टीव्ही मालिकांमध्येही काम करून आपला ठसा उमटवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोनालिसाने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज ती लक्झरी लाईफ जगते. तिच्याकडे सर्व सुख-सुविधा आहेत. आज ती कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची मालकीन आहे. पण एक काळ असा होता जेव्हा मोनालिसा रात्रंदिवस काम करून 120 रुपये कमवू शकत होती.
मोनालिसाचा जन्म 21 नोव्हेंबर 1982 रोजी बंगालची राजधानी कोलकाता येथे झाला. मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. मोनालिसा 16 वर्षांची असताना एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. त्या बदल्यात तिला रोज फक्त 120 रुपये मिळायचे.
मोनालिसा पहिल्यांदा ओडिया भाषेतील चित्रपटामध्ये दिसली होती. आज मोनालिसा हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. पण मोनालिसाला एकेकाळी बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम करावे लागले होते.
मोनालिसा ही वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉसच्या 10 व्या सीझनमध्ये देखील दिसली होती. बिग बॉसमध्ये आल्यानंतर अभिनेत्रीला टीव्ही मालिकांमध्येही काम करण्याची संधी मिळाली.
मोनालिसाने 'नजर 1' आणि 'नजर 2' या मालिकांमध्ये काम केले आहे. या शोमध्ये तिने डायनची भूमिका साकारली जी लोकप्रिय झाली. याशिवाय मोनालिसाने 'बेकाबू' शोमध्येही काम केले आहे.
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहां जायबा राजा नजरिया लडाईके' या पहिल्या भोजपुरी चित्रपटातून मोनालिसा स्टार बनली. निरहुआसोबतचा त्यांचा पहिला भोजपुरी चित्रपट हिट ठरला होता.
यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. भोजपुरी व्यतिरिक्त, अभिनेत्रीने तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी, ओरिया आणि बंगाली भाषांमधील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
एकेकाळी हॉटेलमध्ये काम करून 120 रुपये कमावणारी मोनालिसा आज 20 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीन आहे. मोनालिसा एका भोजपुरी चित्रपटासाठी 10 लाख रुपये मानधन घेते.