प्यार किया तो डरना क्या : बॉलिवूडच्या या क्युट जोड्यांकडून प्रेमाचा रंग जाणून घ्या
प्यार किया तो डरना क्या.. या यादीत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं पहिलं नाव घ्यावं लागेल. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरशी डेट करत आहेत. या दोघांनाही आपलं नातं जाहीरपणे स्वीकारलं आहे. दोघेही सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या बॉलिवूडमधील क्युट जोडीचाही या यादीत समावेश करावा लागेल. या लव्ह बर्ड्सच्या अफेअरबाबत गेल्या काही काळापासून बरीच चर्चा सुरू आहे. बर्याच वेळा या दोघांनाही मुंबईत बऱ्याच ठिकाणी स्पॉट केले गेले आहे. पण त्यांनी सर्वांसमोर कधीही आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही. ते म्हणतात प्रेम लपविण्यामध्ये एक वेगळी मजा आहे.
अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेक दिवसांपासून आपल्या कानांवर येत आहेत. मात्र, आजपर्यंत दोघांनीही त्यांचे प्रेम माध्यमांसमोर स्वीकारलेले नाही. कतरिना कैफच्या घराबाहेर अनेक वेळा विक्की कौशल स्पॉट झाला आहे. ही जोडी आजकाल बी टाऊनच्या जोडीपैकी सर्वाधिक चर्चेत आहेत.
किड स्टार इशान खट्टर आणि अनन्या पांडे एकत्रखूपच उठून दिसतात. पण मीडिया रिपोर्टनुसार ईशान खट्टर आणि अनन्या पांडे एकमेकांना डेट करत आहेत. बऱ्याच दिवसांपूर्वी इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा मालदीवचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोघांनाही मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना पाहण्यात आले होते.
अरबाज खानचे नाव मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीशी जोडले जात आहे. दोघेही बर्याच दिवसांपासून एकमेकांसोबत आहेत.