Madhuri Dixit Marathi Movie: माधुरी दीक्षितनं केली 'पंचक' चित्रपटाची घोषणा; शेअर केली खास पोस्ट
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाधुरीनं बकेट लिस्ट या मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे.बकेट लिस्ट या चित्रपटानंतर माधुरीच्या आगामी मराठी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.
माधुरीनं आज दसऱ्यानिमित्ताने तिच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. माधुरीच्या आगामी मराठी चित्रपटाचं नाव 'पंचक' असं आहे.
माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी 'पंचक' या आगामी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक खास व्हिडीओ शेअर करुन माधुरी आणि श्रीराम नेने यांनी त्यांच्या 'पंचक' या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे.
माधुरीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आरएनएम मूव्हिंग पिक्चर्स आणि जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित “पंचक” चित्रपटाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे! एका अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभवासाठी सज्ज व्हा!
5 जानेवारी 2024 रोजी “पंचक” हा चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती माधुरीनं या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
माधुरीनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन नेटकऱ्यांनी माधुरी आणि श्रीराम नेने यांना त्यांच्या 'पंचक' या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
माधुरीच्या आगामी चित्रपटांची चाहता उत्सुकतेने वाट बघत असतात. बेटा , खलनायक, हम आप के है कौन,दिल तो पागल है या माधुरीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
माधुरीची द फेम गेम ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या सीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.