Shiv Sena Dasara Melava 2023 : आझाद मैदानावर शिंदेंचा आवाज घुमणार, दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांची तुफान गर्दी
या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहिल्याचं चित्र सध्या आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेत दोन गट पडल्याने आता कार्यकर्ते आपापल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.
मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झालेत.
आझाद मैदानावर तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणं बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवली गेली आहे.
दरम्यान या दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार.
गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये शिवसेनेमध्ये दोन गट पडले आणि शिंदे गटाने वेगळा सवतासुभा मांडला.
शिंदे गटातील काही नेते या व्यासपीठावर भाषण देखील करणार आहेत.
या दसरा मेळाव्यातून शिंदे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तसेच या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक दाखल झालेत.