Sidhu Moose Wala : 'सो हाई' गाण्यामुळे रातोरात स्टार झालेले सिद्धू मुसेवाला यांचा जीवनप्रवास
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमुळे संगीतक्षेत्रासह मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांना ओळखले जायचे.
तरुणांचा आवडता गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांचा जन्म 11 जून 1993 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील मुसा गावात झाला.
सिद्धू मुसेवाला यांनी कॉलेजमध्ये असताना अनेक आंतरमहाविद्यालयीन गाण्यांच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
सिद्धू मुसेवाला यांनी लुधियानाच्या गुरू नानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
सिद्धू मुसेवाला यांनी गीतकार म्हणून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे.
'सो हाई' या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना लोकप्रियता मिळाली. या गाण्यामुळे सिद्धू मुसेवाला यांचे नाव जगभरात ओळखले जाऊ लागले.
सिद्धू मुसेवाला यांच्या 'सो हाई' या गाण्याला यूट्यूबवर 477 मिलिअन व्हूयूज मिळाले आहेत.
पंजाब सरकारने कालच 424 लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता.यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डाॅ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.