Kriti Sanon : क्रिती सेननपासून दीपिकापर्यंत, 'या' सेलिब्रिटींच्या रिअल लाईफ Kiss वरून वाद
तिरुपती मंदिराबाहेर ओम राऊतनं क्रिती सेननला किस केलं होतं, त्यानंतर हे दोघंही वादात सापडले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर आल्यावर एकमेकांना निरोप देताना ओम राऊत आणि क्रिती यांनी मिठी मारली आणि ओमनं क्रितीला गालावर 'गुडबाय' किस केलं.
ओम राऊतनं क्रितीला केलेलं 'गुडबाय किस' वादात सापडलं आहे. याआधीही अनेकवेळा सेलिब्रिटी खुलेआम किस करण्यावरून वादात सापडले आहेत. नेटकऱ्यांनी दोघांना धारेवर धरलं आहे.
शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेरे यांनाही गर्दीच्या ठिकाणी मंचावर किस करणं महागात पडलं होतं. रिचर्डने शिल्पाला जबरदस्तीने किस केलं होतं. या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
एका मासिकाच्या कव्हरवर महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांचा फोटो दिसला होता. या फोटोमध्ये पूजा आणि महेश एकमेकांसोबत लिपलॉक करताना दिसत होते. बाप-लेकीला असं करताना पाहून चाहत्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं होतं.
अभिनेत्री रेखाने एकदा हृतिक रोशनला त्याच्या हनुवटीवर किस केलं होतं. रेखाचे हे कृत्य चाहत्यांना आवडलं नाही आणि लोकांनी दोघांना ट्रोल केलं होतं.
शाहिद कपूर आणि करीना कपूरचा एक व्हिडीओ लीक झाला होता. या व्हिडीओमध्ये दोघेही लिपलॉक करताना दिसत होते. यानंतर शाहिद आणि करीनाला खूप ट्रोल करण्यात आले.
क्रिकेट स्टेडियममध्ये सिद्धार्थ मल्ल्याने दीपिका पदुकोणला किस केलं होतं. यामुळे दोघेही वादात सापडले होते.
गायक मिका सिंगने राखी सावंतला तिच्या वाढदिवशी जबरदस्तीने किस केलं होतं. यानंतर दोघांनाही विरोधाला सामोरे जावं लागलं.