Kangana Ranaut : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) लॉक-अप (Lock Upp) हा शो सध्या चर्चेत आहे.(photo:kanganaranaut/ig)
2/6
या शोमध्ये कंगना अनेक विषयांवर चर्चा करते. या शोमधील स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे किस्से प्रेक्षकांना सांगतात. लॉक-अपच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये कंगनानं बॉलिवूड चित्रपटसृष्टीबाबत काही गोष्टी सांगितल्या.(photo:kanganaranaut/ig)
3/6
लॉक-अप शोमध्ये कंगनानं सांगितलं, मी टू मूव्हमेंटला समर्थन केल्यानं कंगनाला बॉलिवूडमध्ये बॅन करण्यात आलं होतं. तिनं सांगितलं की, पायल घोषने 2020 मध्ये चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर कंगनानं पायलचं समर्थन केलं होतं.(photo:kanganaranaut/ig)
4/6
लॉक-अपमधील स्पर्धक सायशा शिंदेनं तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. त्यानंतर कंगना म्हणाली, 'मला वाटतं की चित्रपटसृष्टीमध्ये तरूणांचे लैंगिक शोषण ही खूप साधारण गोष्ट आहे. आपण कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी हे चित्रपटसृष्टीचं कटू सत्य आहे.'(photo:kanganaranaut/ig)
5/6
प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये लैंगिक शोषण होते. पण बॉलिवूडमधील लोकांना लायसेन्स मिळालं आहे, असं कंगना म्हणाली. पुढे तिनं सांगितलं, जेव्हा मी टू झाले तेव्हा ज्या मुलींनी त्यांच्यासोबत घडलेली घटना सांगितली त्यामुलींचे नंतर काय झाले? त्या मुली गायब झाल्या.'(photo:kanganaranaut/ig)
6/6
‘लॉकअप’ शोमध्ये सर्व स्पर्धकांवर 24x7 लक्ष ठेवले जाते. Alt Balaji आणि MX Player या अॅप्सवर तुम्ही लॉकअप हा शो पाहू शकता. कंगनाचा लवकरच धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(photo:kanganaranaut/ig)