Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kajal Aggarwal पासून Allu Arjun पर्यंत, ग्रॅण्ड वेडिंग करणारे साऊथ सुपरस्टार्स

भारतात लग्नाला अतिशय महत्त्व असतं. इथे लग्न अतिशय धुमधडाक्यात केलं जातं. प्रत्येक भागातील, धर्मातील रितीरिवाज वेगवेगळे आहेत. लग्न जर एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं असेल तर ते ग्रॅण्ड असतंच. दक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीमधील असे काही कलाकार आहेत, ज्यांनी लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. खाण्यापासून कपडे आणि दागिन्यांनी त्यांनी तुफान खर्च केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेता धनुषने दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केलं होतं. हे लग्न तामिळ इंडस्ट्रीतील महागड्या लग्नांपैकी एक समजलं जातं.

बाहुबली फेम राणा दग्गुबातीने मिहिका बजाजसोबत लग्न केलं. त्याच्या लग्नात सजावटीपासून डिझायनर कपडे आणि दागिन्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते.
सुपरस्टार अल्लू अर्जुनचं लग्नही ग्रॅण्ड होतं. त्याच्या लग्नात जवळपास 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, असं म्हटलं जातं.
दक्षिण आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री काजल अग्रवालचं लग्नही काही महिन्यांपूर्वीच झालं. तिने लग्नात पाच लाख रुपयांचा लहेंगा परिधान केला होता. तर लग्नात आलेल्या फोटो फोटोग्राफर्सना दररोज दीड लाख रुपये देण्यात आले होते, असं समजतं.
अभिनेता राम चरणचं लग्नही सर्वात महागड्या लग्नापैकी एक गणलं जातं.