Janhvi Kapoor: बॅकलेस ड्रेस, मोकळे केस आणि ग्लॅमरस अंदाज; जान्हवीच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजान्हवीनं नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कारसाठी जान्हवीनं खास लूक केला होता.
जान्हवीच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
ग्रीन कलरचा बॅकलेस ड्रेस, मोकळे केस आणि न्यूड मेकअप अशा लूकमधील फोटो जान्हवीनं शेअर केले आहेत.
जान्हनीच्या या लूकचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
जान्हवीनं तिच्या या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
जान्हवीचा बवाल हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
'एनटीआर 30' या चित्रपटामधून देखील जान्हवी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
जान्हवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे.