Ira Khan and Nupur Shikhare: भरजरी लेहंगा आणि हातावर मेहंदी; रिसेप्शनसाठी आयराचा खास लूक, आमिरच्या जावयाच्याही लूकनं वेधलं लक्ष!
अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान हिचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. आयरा आणि नुपूर शिखरे यांनी ख्रिचन पद्धतीनं लग्न केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता लग्नसोहळ्यानंतर नुपूर आणि आयरा यांचे रिसेप्शन पार पडत आहे. त्यांच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रिसेप्शनसाठी आयरा आणि नुपूर यांनी खास लूक केला. तसेच आमिरनं देखील लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी खास लूक केला.
भरजरी लेहंगा, मोकळे केस आणि हातावर मेहंदी असा लूक आयरानं केला. तर नुपूरनं रिसेप्शन सोहळ्यासाठी ब्लॅक आऊटफिट परिधान केला होता.
लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी आमिरनं ब्लॅक कुर्ता, व्हाईट पँट आणि ब्लॅक शूज असा लूक केला होता.
आयरानं रिसेप्शन सोहळ्यात तिच्या सासूबाईंसोबत फोटोसाठी पोज देखील दिली.
रिसेप्शन सोहळ्यात आयरा आणि नुपूरच्या कुटुंबानं पापाराझींना पोज दिली.
आयराची आई रीना दत्ता यांनी रिसेप्शनसाठी रेड कलरची साडी आणि हेवी ज्वेलरी असा लूक केला.