Healthy Tips : तुम्हालाही उच्च रक्तदाब कमी करायचाय? मग काळ्या मिरीचे 'या' पद्धतीने सेवन करा
भारतात, प्राचीन काळापासून औषधांना पर्यायी औषध म्हणून मसाल्यांचा वापर केला जात आहे. मसाल्यांचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंशोधनात असे दिसून आले आहे की, काळी मिरीमध्ये काही घटक आढळतात जे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतात. म्हणजेच ते शरीरातील पेशींचे संरक्षण करतात. तसेच, काळी मिरी रक्ताच्या नसा विस्तारण्यास देखील मदत करते, ज्यामुळे रक्तदाब आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.(Photo Credit : Pixabay)
काळ्या मिरीमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे. याशिवाय काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन ए, ई, सी देखील आढळते. इतकेच नाही तर काळ्या मिरीमध्ये काही घटक असतात ज्यांना अँटिऑक्सिडंट असे म्हटले जाते.(Photo Credit : Pixabay)
हे घटक शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. काळया मिरीच्या या गुणधर्मामुळे ती अनेक आजरांवर मात करण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)
तसेच तिचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर घसादुखी पासून आराम मिळतो. त्यामुळे काळी मिरीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. (Photo Credit : Pixabay)
उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेकदा जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे उद्भवते. अशा परिस्थितीत ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी काळी मिरी हा एक सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय मानला जातो. (Photo Credit : Pixabay)
काळ्या मिरीमध्ये 'पाइपेरिन' नावाचे रसायन असते, जे रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रक्त प्रवाह योग्य ठेवण्यास मदत करते. यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करते आणि सोडियमचे संतुलनही राखते. जर तुम्ही ते रोज वापरत असाल तर काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल.(Photo Credit : Pixabay)
सकाळी रिकाम्या पोटी उठताच एक ग्लास कोमट पाण्यात १ ते २ काळी मिरी ठेचून प्या. जर पाण्याचे तापमान असह्य असेल तर कोमट पाणी देखील वापरता येते.(Photo Credit : Pixabay)
रोज सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात पाहण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)