Nagpur News: भोसला सैन्य शाळेच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण; विद्यार्थ्यांनी सादर केल्या चित्त थरारक आणि आकर्षक परेड कवायती
नागपूरातील भोसला सैन्य शाळेच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होत असून आज शाळेचा 25 वा वार्षिक उत्सव नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानावर साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सोहळ्यात भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी उपस्थित आहेत. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
या कार्यक्रमात भोसला सैन्य शाळेतील विद्यार्थी आकर्षक आणि चित्त थरारक परेड ही करत सऱ्यांचेच लक्ष वेधले.
भोसला सैन्य शाळा नाशिक आणि नागपूर ने मिळून आजवर भारतीय सैन्याला 500 पेक्षा जास्त अधिकारी दिले आहे.
देशाला अनुशासित नागरिक देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच आम्ही विदर्भातील पहिली खास मुलींची सैन्य शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर म्हणाले.
देशभक्त तरुण पिढी निर्माण करण्याच्या ज्या विचारातून भोसला सैन्य शाळेची स्थापना झाली होती. ते आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.आज नवीन भारत आपण पाहत आहो, जो कोणाला घाबरत नाही. जो कोणाच्या रोखल्याने थांबत नाही आणि यात भारतीय सैन्याचा योगदान महत्वाचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले.
आज जगाला विश्वास वाटत आहे की जगात भारतच जगात शांतता आणू शकतो. कारण जो मजबूत देश आहे, तोच जगात शांतता आणू शकतो.मजबूर देश शांतता आणू शकत नाही. जो भारत सैन्यासाठी लागणारे शस्त्र कधी आयात करत होता, तोच भारत आज देशात शस्त्र निर्माण करत आहे. निर्यात ही करत आहे. हे आत्मनिर्भर भारताचे चिन्ह असल्याचे देखील उपमुख्यमंत्री म्हणाले.
भोसला सैन्य शाळा कॅडेट्स ला देशप्रेम, राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीचे धडे देत आहे.
मी पण 1976 मध्ये भोसला मिलिटरी शाळेत उन्हाळी शिबीर केले होते. तिथे शिकलेले गुणांमुळे मी आज सैन्यात उच्च पदावर पोहोचलो. असे मत भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी यांनी व्यक्त केले.
आपल्या सैन्य शाळांना स्टेट बोर्डचे अभ्यासक्रम आहे. त्यामुळे आपले विद्यार्थी NDA च्या परीक्षेत पास होत नाही. कारण तिथे सीबीएससी अभ्यासक्रम असते. त्यामुळे मी लवकरच नवे धोरण जाहिर करणार आहे, ज्याद्वारे अशा शाळा जिथे सीबीएससी अभ्यासक्रम असेल त्यांना ही आमचे अनुदान मिळेल. असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.