International Yoga Day 2021: शिल्पा शेट्टीपासून मलायका अरोरापर्यंत 'या' अभिनेत्रींची सकाळ होते योगाने
Shilpa Shetty- अभिनेत्री शिल्पा शेट्टीला योगासनाचं वेड आहे. ती नियमितपणे योग करते. हेच कारण आहे की ती पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि 46 व्या वर्षीही ती केवळ 30 वर्षांची दिसते. शिल्पा सोशल मीडियावर योगा करताना आपले व्हिडिओ शेअर करते, जे इतरांनाही प्रेरित करतात. (फोटो - सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushmita Sen- अभिनेत्री सुष्मिता सेनला योगाचे महत्त्व चांगले माहित आहे. यामुळेच तिची सकाळ योगाने सुरु होते. योगाबरोबरच ती जिममध्येही खूप घाम गाळते. (फोटो - सोशल मीडिया)
Kareena Kapoor- पहिल्या प्रसूतीनंतरही करीना कपूरने योगाचा आधार घेतला जेणेकरून ती पुन्हा फॉर्मात येऊ शकेल आणि आता दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर करीना नियमितपणे योगा करत आहेत. प्रसूतिकाळातही करीना बरीच योगा करायची. (फोटो - सोशल मीडिया)
Malaika Arora- ज्या दिवशी मलायका योग केंद्रात दिसली नाही, तो दिवसच समजायचा नाही. मलायका 47 वर्षांची आहे, म्हणजे येत्या 3 वर्षांत ती 50 वर्षांची होईल. परंतु, तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज घेणे कठीण होते. आजही ती एकदम फिट दिसत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Bipasha Basu- सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी बिपाशा फिटनेससोबत तडजोड करीत नाही. तिच्या रोजच्या नित्यकर्मात योगाचा समावेश आहे आणि यामुळे बिपाशा पूर्णपणे फिट दिसते. (फोटो - सोशल मीडिया)
Jacqueline Fernandez - ही परदेशी मुलगीही योगासने करुन स्वत:ला फिट ठेवते. ती दररोज योगासने करते आणि नंतर जीममध्ये घाम गाळून स्वत:ला फिट ठेवते. (फोटो - सोशल मीडिया)