India's Richest Singer : हिंदू कुटुंबात जन्म, स्वीकारला इस्लाम धर्म, हा आहे भारतातील सर्वात श्रीमंत गायक; संपत्ती जाणून घ्या
भारतीय चित्रपटांमध्ये गाण्यांना नेहमीच महत्त्व दिलं जातं. कोणताही चित्रपट गाण्याशिवाय अपूर्ण मानला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगाणी चित्रपटांना अधिक मनोरंजक बनवतात. अनेक चित्रपट गाण्यांमुळेही हिट होतात.
बॉलिवूडच्या इतिहासात एकापेक्षा एक गायक आहेत. पण भारतातील सर्वात श्रीमंत गायक कोण आहे? हे तुम्हाला माहित आहे का?
संपत्तीच्या बाबतीत हा गायक बड्या सुपरस्टार्सनाही मागे टाकतो. या गायकाची भारतातच नाही जगभरात मोठी फॅन फॉलोईंग आहे.
या गायकाने जगात मोठी ओळख निर्माण केली आहे. गायक असण्यासोबतच ते प्रसिद्ध संगीतकार देखील आहेत.
भारतातील हा गायक म्हणजे एआर रहमान. गायक आणि संगीतकार एआर रहमान यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
एआर रहमान यांचा जन्म हिंदु कुटुंबात झाला, पण नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
एआर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी एका हिंदू कुटुंबात झाला.
एआर रहमान यांचं खरं नाव दिलीप कुमार होतं. मात्र, नंतर त्यांच्या कुटुंबाने 1988 मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला. एआर रहमान यांचं पूर्ण नाव अल्लाह राखा रहमान असं आहे.
एआर रहमान यांनी आपल्या गाण्यांनी जगभरात नाव कमावलं आहे. एआर रहमान यांना 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील साउंड ट्रॅकसाठी संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठीत ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे.
देशातील सर्वात श्रीमंत गायक असण्यासोबतच, एआर रहमान यांची गणना भारतातील सर्वात महागड्या गायकांमध्ये देखील केली जाते. एका गाण्यासाठी ते सुमारे तीन कोटी रुपये मानधन घेतात.
एआर रहमान भारतातील सर्वात श्रीमंत गायक आहेत. माय नेशनच्या रिपोर्टनुसार, एआर रहमान यांची एकूण संपत्ती 1728 कोटी रुपये आहे.
एआरने सायरा बानोसोबत 1995 मध्ये लग्न केलं. त्यांना खदिजा आणि रहीमा या दोन मुली आणि अमीन नावाचा मुलगा आहे.