'हे' तीन स्टॉक्स तुम्हाला देणार तगडे रिटर्न्स, जाणून घ्या स्टॉपलॉस आणि टार्गेट काय?
Stocks to BUY: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या पोझिशनल ट्रेड करण्याचा सल्ला दिला जात आहे. कॅनरा बँक सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने पोझिशनल ट्रेडसाठी काही स्टॉक्स सूचवले आहेत. आगामी 6-8 आठवड्यांसाठी 3 सर्वोत्तम शेअर्स सूचवले आहेत. या सर्व स्टॉक्सचा स्टॉपलॉस, टार्गेट काय असावे हे जाणून घेऊ या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDeepak Nitrite ही रसायन क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. आगामी 3-4 आठवड्यांसाठी या कंपनीत गुंतवणूक करता येईल, असे कॅनरा बँक सिक्योरिटीजने सूचवले आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 2805 रुपयांचा स्टॉपलॉस असायला हवा. तसेच पहिले टार्गेट हे 3150 रुपये तर दुसरे टार्गेट 3300 रुपये असावे, असे कॅनरा बँक सिक्योरिटीजने म्हटले आहे.
Deepak Nitrite Share Price हा शेअर या आठवड्यात 2930 रुपयांवर बंद झाला. या शेअरने दोन आठवड्यात चार टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. तर या कंपनीने तीन महिन्यांत 30 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
Senco Gold या दागिने तयार करणाऱ्या कंपनीतही गुंतवणूक करण्याचे कॅनरा बँक सिक्योरिटीजने सूचवले आहे. हा शेअर सध्या 1189 रुपयांवर आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर 1129 रुपयांचा स्टॉपलॉस तर पहिले टार्गेट 1271 रुपये आणि दुसरे टार्गेट 1332 रुपये ठेवायला हवे. सात ते नऊ आठवड्यांसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करावी असे, कॅनरा बँक सिक्योरिटीजने सूचवले आहे.
सेनको गोल्ड या शेअरने एका आठवड्यात 9 टक्के तर एका महिन्यात 19 टक्क्यांनी रिटनर्न्स दिले आहेत. ही कंपनी मुख्यत्वे सोने आणि हिऱ्याचे दागिने तया करते.
डायवर्सिफाइड कमर्शियल स्पेसिंगचे काम करणाऱ्या Quess Corp Share Price Target या कंपनीतही गुंतवणूक करावी असे कॅनरा बँक सिक्योरिटीजने सूचवले आहे. या कंपनीचा शेअर शुक्रवारी 800 रुपयांवर बंद झाला. आगामी सात ते आठ आठवड्यांसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करता येईल, असे कॅनरा बँक सिक्योरिटीजने सूचवले आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर 860 रुपयांचे पहिले तर 900 रुपयांचे दुसरे टार्गेट ठेवायला हवे. तर 762 रुपयांचा स्टॉपलॉस लावायला हवा, असे कॅनरा बँक सिक्योरिटीजने सूचवले आहे. या शेअरने या आठवड्यात 2.4 टक्क्यांनी तर दोन आठवड्यांत 9 टक्क्यांनी तसेच एका महिन्यात 22 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)