In Pics: ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर ज्येष्ठ साहित्यिकांच्या स्मरणार्थ अंधबांधवांसोबत साजरा झाला अनोखा दीपोत्सव
ठाण्यातील अभिनय कट्टयावर किरण नाकती यांच्या संकल्पनेतून जेष्ठ साहित्यिक व अंध बांधवांच्या उपस्थितीत रंगला अनोखा दीपोत्सव.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिमिरातुनी तेजाकडे असे म्हणत ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या हस्ते अंध बांधवांना सोबत घेऊन दिवंगत साहित्यिकांच्या स्मरणार्थ अकरा दिवे लावण्यात आले.
पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, सुनिता देशपांडे, रत्नाकर मतकरी, व्यंकटेश माडगूळकर, व पू काळे, द मा मिरासदार, विं दा करंदीकर, शंकर पाटील, मुरलीधर गोडे या अकरा श्रेष्ठ दिवंगत साहित्यिकाच्या स्मरणार्थ ठाण्यातील अकरा ज्येष्ठ साहित्यिकांनी अंध बांधवांना सोबत घेऊन दिप प्रज्वलित केले.
नव्या पिढीमध्ये साहित्य वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
साहित्य संस्कृती लोप पावत चालली असल्याने हा दीपोत्सव नक्कीच प्रेरणा देणारा ठरणार आहे.
याप्रसंगी अभिनय कट्टा व ओमकार अंध सेवक सोसायटीच्या वतीने एकावन्न अंध बांधवांना दिवाळी भेट देण्यात आली.