In Pics | दिवाळीनिमित्त अमरावतीत 11 हजार रुपयांची 'कलश भोग' मिठाई
अमरावतीतील एका मिठाईच्या दुकानात दिवाळीसाठी एक हटके मिठाई तयार करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे, ही मिठाई सोन्यापासून तयार करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीनिमित्त विदर्भात नामांकित असलेल्या अमरावतीची रघुवीर स्वीट मार्टनी यावर्षी तब्बल 11 हजार रुपये किलो असलेली शुद्ध सोन्याची वर्क लावलेली सोनेरी कलश ही मिठाई बाजारात आणली आहे.
विदर्भातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांकरिता 'कलश भोग' सोबत अन्य विविध प्रकारच्या मिठाई उपलब्ध करून दिल्या आहेत.
मामरा बदाम, पिसोरी पिस्ता, शुद्ध केसर या ड्रायफ्रुट पासून ही मिठाई तयार करण्यात आली आहे.
या मिठाईवर खास दिल्लीच्या नोएडा येथून मागवलेला सोन्याचा 24 कॅरेट वर्ख बोलावून सर्टिफिकेटसह मिठाईवर लावलेला आहे. तर राजस्थान मधील कारागिरांनी ही विशेष मिठाई तयार केली आहे.
शुद्ध सोन्याचा वर्ख असलेल्या या मिठाईची किंमत 11 हजार रुपये प्रति किलो इतकी असून रघुवीर मिठाईच्या राजापेठ येथील प्रतिष्ठानात ही मिठाई विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आली आहे.
रघुवीर स्वीट मार्ट हे अमरावती शहरातील मिठाई आणि नमकीनसाठीचे एक सुप्रसिद्ध नाव आहे.
दरवर्षी दीपावली सणानिमित्त रघुवीर स्वीट मार्ट आपल्या ग्राहकांना नवीन मिठाई उपलब्ध करुन देत असतं. यापूर्वी गोल्डन बिस्किट, सोनरी पॅन आणि आता सोनरी भोग या मिठाई ग्राहकांची दिवाळी खास करणार आहेत.