In Pics: मराठमोळ्या साडीत खुललं धकधक गर्लचं सौंदर्य (Madhuri Dixit), फोटो बघताच चाहत्यांच्या हृद्याचे चुकले ठोके
माधुरी दीक्षितने नुकतेच गुलाबी सिल्कच्या साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाडी, केसांत माळलेला गजरा, मोठे कानातले आणि कपाळावरची टिकली माधुरीच्या लूकला चार चॉंद लावत आहे.
माधुरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच वेगवेगळ्या लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. माधुरीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
नुकताच माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिचा मुलगा रायन कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी केस दान करताना दिसून आला. त्यामुळे माधुरीने व्हिडीओ शेअर करत मुलाला हीरो म्हटले आहे.
बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित करण जोहरच्या 'कलंक' सिनेमात प्रेक्षकांना स्क्रीनवर शेवटची दिसली होती.
माधुरीचा आगामी 'अनामिका' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून माधुरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करताना दिसून येणार आहे.