Pathaan ते Adipurush; IMDB ने जाहीर केली बहुप्रतिक्षीत भारतीय सिनेमांची यादी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी 'टायगर 3' चा सिनेमा येत्या वर्षात 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद खानने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सलमान खानसह कतरिना कैफ स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खानचा आगामी 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्यासह अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.
शाहरुख खानचा बहुचर्चित 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. शाहरुखसह या सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
रोहित धवनचा आगामी 'शहजादा' हा सिनेमा 10 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन, परेश रावल, कृती सेनन मुख्य भूमिकेत आहेत.
'सालार' हा दाक्षिणात्य सिनेमा या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि परिणीती चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'अॅनिमल' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टी-सीरिज या सिनेमाची निर्मिती करणार आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आदिपुरुष' हा बहुचर्चित सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा आहे. 16 जूनला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रामायणावर आधारित या सिनेमात सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान, कृती सेनन आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मराठमोळ्या ओम राऊतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
शाहरुख खानचा बहुचर्चित 'जवान' हा सिनेमा 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपथी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एटली कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
राजकुमार हिरानीचा 'डंकी' हा सिनेमा 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.