PHOTO : मानाच्या काठ्या आणि भंडारा-खोबऱ्याची उधळण; कोरठण खंडोबा यात्रेला लाखो भाविकांची उपस्थिती

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबाची यात्रा ही प्रसिद्ध आहे. हा उत्सव पाहण्यासाठी राज्यातून जवळपास सहा लाख भाविक कोरठण या ठिकाणी दाखल झाले होते.

Korthan Khandoba Yatra

1/9
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबाची यात्रा ही प्रसिद्ध आहे.
2/9
100 फुटांहून अधिक उंच अशा मानाच्या काठ्या हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
3/9
हा उत्सव पाहण्यासाठी राज्यातून जवळपास सहा लाख भाविक कोरठण या ठिकाणी दाखल झाले होते.
4/9
स्वयंभू तांदळासमोर बारालिंग अशा या देवाचे दर्शन घेण्यासाठी केवळ जिल्ह्यातूनच नाही तर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते.
5/9
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे बेल्हा आणि ब्राह्मणगाव इथून आलेल्या मानाच्या उंच काठ्या.
6/9
विशेष म्हणजे या काठ्या जवळपास दीडशे फूट उंच एवढ्या होत्या.
7/9
लाखोंच्या संख्येने आलेले भाविक या मानाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला आणि देवाच्या गाभाऱ्यात टेकवतात.
8/9
तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवासाठी नगर, पुणे, नाशिक आणि ठाणे इथून मोठ्या संख्येने भाविक हे कोरठण खंडोबा इथे दाखल झाले होते.
9/9
या यात्रेत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केली जाते.
Sponsored Links by Taboola