कोण म्हणालं हृतिक, सबाचा ब्रेकअप झाला? जोड्यानं बाप्पाची आरती करताना दिसलं कपल, हा घ्या पुरावा...
Hrithik-Saba Video: सेलिब्रिटी आणि त्यांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. मग त्यांचं लग्न असो वा घटस्फोट... किंवा मग रिलेशनशिफ. इंडस्ट्रीसह सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगलेल्या. पण एका व्हिडीओनं दोन्ही चर्चांना ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे.
आपल्या ब्रेकअपच्या चर्चांवर या कपलनं मात्र पूर्णपणे मौन बाळगलं आहे. पण सोशल मीडियावरच्या एका व्हिडीओनं सर्व चर्चांना पूर्णविराम देत, सर्व काही आलबेल आहे, असा मेसेज सर्वांना दिला आहे.
हृतिक-सबाचा ब्रेकअप झालेला नाही, असं आम्ही उगाच नाही सांगत, तर आम्ही पुरावा देतोय. तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा.
या व्हिडीओमध्ये हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन यांच्या घरच्या बाप्पाची हे जोडपं एकत्र आरती करताना दिसत आहे.
सुनैना यांनी तिच्या गणपतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिनं बाप्पाला घरी कसं आणलं आणि कसं विसर्जन केलं, हे दिसतंय.
सुनैना यांनी व्हिडीओमध्ये बाप्पाच्या प्रतिष्ठापनेपासून त्याच्या विसर्जनापर्यंतच्या सर्व दिवसांच्या पूजा आणि आरतीची झलकही दाखवली आहे.
या व्हिडीओमध्ये सबा आणि हृतिक एकत्र बाप्पाची आरती करताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये सबा आणि हृतिक बाप्पाची आरती करताना दिसत आहेत. त्यानंतर विसर्जनाच्या वेळीही सबा हृतिकसोबत उभी असल्याचं पाहायला मिळतंय.
दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खूश आहेत. तसेच ब्रेकअपच्या सर्व चर्चा आता मावळल्याचं पाहायला मिळतंय.