Pitru Paksha 2024: पितृ पक्षात 'या' दोन झाडांना जल अर्पण करा; पितर नेहमी प्रसन्न राहतील
पिंपळाचं झाड विशेषतः श्राद्ध पक्षात लावावं. याशिवाय पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं. असं मानलं जातं की, यामुळे कुटुंबात आनंद येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुराणांमध्ये सांगण्यात आल्यानुसार, यामध्ये पितरांचा वास असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडावर पाणी आणि तीळ मिसळून दूध अर्पण करावं, यामुळे पितरांची तृप्ती होते.
पितृपक्षाच्या प्रत्येक संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा आणि पितृसूक्ताचं पठण करावं. यामुळे पितृदोष दूर होतो. पैशाचं संकट दूर होईल.
तुलशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जातं. पितृ पक्षात तुळशीची पूजा केल्यानं पितर देखील संतुष्ट होतात, त्यासोबतच माता लक्ष्मी घरात वास करते.
पितृदोषाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी पाचमुखी, सातमुखी, आठमुखी आणि बारामुखी रुद्राक्ष धारण करा. जर हे उपलब्ध नसेल तर तुम्ही नवग्रह रुद्राक्षाची माळ देखील धारण करू शकता.
पितृपक्षात संध्याकाळी जिथे पाणी ठेवले असेल, तिथे पितरांच्या नावानं दिवा लावावा. असं म्हणतात की, यामुळे घरात सुख-शांती कायम राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.