Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
हृतिक रोशन मुंबईत 100 कोटींच्या आलिशान बंगल्यामध्ये राहतो. हृतिकच्या घराच्या बाल्कनीतून समुद्राचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील पॉश वस्तीमध्ये हृतिक रोशनचं घर आहे. जुहू-वर्सोवा लिंक रोडवर हृतिक रोशनचा बंगला आहे. हृतिक रोशन दोन मुले आणि आई-वडिलांसह याच घरात राहतो.
हृतिक रोशन अनेक वेळा त्याच्या आलिशान घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या आलिशान बंगल्याचे इनसाईट फोटो पाहा.
हृतिकचं घर खूप प्रशस्त आहे. यामध्ये महागड्या फर्निचरसह एक मोठी बाल्कनी देखील दिसेल.
हृतिकने लिव्हिंग एरियामध्ये भिंतींवर अभिनेत्याच्या कुटुंबाचे फोटो देखील पाहायला मिळतील. यासोबत फर्निचरही स्टायलिश आहे.
हृतिकच्या घरातील पायऱ्यांवर संगमरवरी फरशी आहे. दिवाळीनिमित्त कुटुंबासोबतचा घराच्या आतील हा फोटो शेअर केला आहे.
या बंगल्यामध्ये मुलांसाठी खास जागा डिझाईन करण्यात आली आहे.
या घरातील इंटिरियर जुन्या आणि नव्या स्टाईलचा संगम आहे.
त्याच्या घरात गेमिंग झोनही आहे.
यासोबतच लायब्ररीमध्ये शांतपणे बसून वाचन करण्याचीही सोय आहे.
हृतिकच्या घरात अनेक अँटिक वस्तूही पाहायला मिळतात.
त्याचा बेडरुम शाही लूकमधील आहे. अनेक वेळा हृतिक बेडरुममधील सेल्फी चाहत्यांसोबत शेअर करतो.
हृतिक फिटनेसची काळजी घेतो. त्यासाठी त्याने घरात एक जिम बनवली आहे.