वयाच्या 40व्या वर्षी 'कामवासना' वाढवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्रीनं थेरपी घेतली; म्हणाली...
'टायटॅनिक' सुप्रसिद्ध हॉलिवूडपटातील प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेटनं मोठा खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की, वयाच्या 40 च्या आसपास तिनं कामवासना वाढवण्यासाठी थेरपीची मदत घेतली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'टायटॅनिक' सारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री केट विन्सलेटनं अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की, तिनं तिचं सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीचा अवलंब केला आहे. अभिनेत्रीनं वयाच्या चाळीशीच्या आसपास ही थेरपी घेतलेली. आता केट विन्सलेट सध्या 48 वर्षांची आहे.
हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री केट विन्सलेटनं एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा करून तिनं सर्वांनाच हैराण केलं आहे. केटनं सांगितलं की, वयाच्या चाळीशीच्या आसपास तिनं टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी घेतली होती.
48 वर्षांच्या केटनं अलीकडेच 'हाऊ टू फेल विथ एलिझाबेथ डे पॉडकास्ट' मध्ये आपल्या या थेरपीबाबत खुलासा केला आहे. तिनं सांगितले की, कधीकधी महिलांच्या कामवासनेत घट होते, कारण त्यांच्या थायरॉईड आणि टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत घट होते.
अभिनेत्री पुढे म्हणते की, बऱ्याच जणांना हे माहीत नाही, पण महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन असतं आणि जेव्हा ते संपतं, तेव्हा शरीरात खूप गडबड होऊ शकते.
केटनं पुढे बोलताना सांगितलं की, एकदा का शरीरातील टेस्टोस्टेरॉन पूर्णपणे संपलं, तर तुम्हाला हे रिप्लेस करण्याची खरंच गरज असते. थेरपीमार्फत तुम्ही हे करू शकता. त्यानंतर तुम्हाला खूप वेगळं वाटतं... मला माहीत आहे.
हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीनं महिलांच्या शरीरात वाढत्या वयानुसार होणाऱ्या बदलांबाबतही सांगितलं. ती म्हणाली की, याच तुमची काहीच चूक नाही, वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात. खासकरुन जेव्हा तुम्ही म्हातारे होता.
केटनं हेदेखील सांगितलं की, वाढत्या वयासोबत महिला आणखी सुडौल होतात. मी माझ्या अनेक मित्र मैत्रिणींना नेहमी सांगते की, आज तू खूपच अद्भूत दिसतेयस.
दरम्यान, केट विंसलेटनं 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टायटॅनिक'मध्ये रोज ही मुख्य भूमिका निभावली होती. केटनं आपल्या अभिनयानं जगभरातील अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तिचा आगामी चित्रपट 'ली' मध्ये ती लवकरच दिसणार आहे.