Sushmita Sen: सुष्मिता सेनच नव्हे तर 'हे' सुपरस्टार मरणाच्या दारातून आले परत, हर्ट अटॅकमधून वाचले
सुष्मिता सेनला नुकतीच हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर तिला अँजिओप्लास्टी करावी लागली असून आता तब्येत बरी असल्याचं तिने सांगितलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंटही टाकण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डॉक्टरांनी 'माझं हृदय फार मोठं आहे' असं सुष्मिता सेननं सांगितलं.
ज्या लोकांनी मला वेळेवर मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानते, या सगळ्यात चांगली बातमी अशी आहे की, मी आता पूर्णपणे बरी आहे आणि मी माझं आयुष्य पुन्हा जगण्यास तयार आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अशी पोस्ट सुष्मिता सेनने लिहिली आहे.
पण सुष्मिता सेनच्या आधीही काही सुपरस्टारना हर्ट अटॅक आला आहे, पण मरणाच्या दारातून ते वाचले आहेत.
कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला 2020 मध्ये वर्कआउट करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेथे उपचारानंतर तो बरा झाला.
कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरला गेल्या वर्षी 2022 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर चार बायपास शस्त्रक्रिया झाल्या. उपचारानंतर तो आता पूर्णपणे बरा आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांना 2021 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
सैफ अली खानला देखील 2007 साली माईल्ड अॅटॅक आला होता. त्यावेळी 36 वर्षाच्या सैफ अली खानला हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी पडल्याने हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता.