Photo: उन्हाळ्यात एकाच प्रकारचे सॅलड खाऊन कंटाळा आलाय? तर हे टेस्टी आणि हेल्दी मिक्स सॅलड ट्राय करा

तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर हे सॅलड तुम्ही दुपारच्या जेवणात अगदी सहज बनवून खाऊ शकता.

Mixed Salad

1/8
1. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी पोटाला काहीतरी थंडावा मिळावा असे पदार्थ तुम्हाला खायची इच्छा झाली असेल तर आम्ही तुमच्यासाठी सॅलडची एक विशिष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. त्याने तुम्हाला काहीतरी चमचमीत पदार्थ खाल्ल्याचं समाधान मिळेल.
2/8
2. उन्हाळ्याच्या दिवसांत तुम्हाला जर हेल्दी नाश्ता खायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. ही सॅलड रेसिपी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे.
3/8
3. मिक्स सॅलडची ही एक सोपी रेसिपी आहे, ज्यासाठी कष्ट आणि कमीत कमी वेळ लागतो. हे अवघ्या 20 मिनिटांत तयार केले जाऊ शकते.
4/8
4. ही कॉन्टिनेन्टल सॅलड रेसिपी पालक, छोले, बटाटे, गाजर, काकडी, टोफू, बीट, मेयॉनिज आणि काही मसाल्यांचे मिश्रण एकत्र करून तयार केली जाते.
5/8
5. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर हे सॅलड तुम्ही दुपारच्या जेवणात अगदी सहज बनवून खाऊ शकता.
6/8
6 .सर्वात आधी छोले पाण्यात धुवून घ्या. कुकर मंद आचेवर ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये छोले आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून उकडवून घ्या. त्यानंतर कढई मंद आचेवर ठेवून त्यात ऑलिव्ह ऑईल गरम करा. तेल पुरेसं गरम झाल्यावर त्यात टोफूचे चौकोनी तुकडे घाला आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.
7/8
7.आता एका मोठ्या बाऊलमध्ये चिरलेल्या पालकची पाने, चिरलेला बटाटा आणि बीट, किसलेले गाजर, उकडलेले छोले घाला. हे सर्व मिश्रण एकत्रित करा.
8/8
8. या मिश्रणात तळलेले टोफू क्यूब्स, चिली फ्लेक्स, लिंबाचा रस, आल्याचे काप, ऑलिव्ह ऑईल आणि मेयॉनिज घाला. हे सर्व मिश्रण एकत्र करा. तुमचं हेल्दी आणि टेस्टी सॅलड खाण्यासाठी तयार आहे.
Sponsored Links by Taboola