Health Tips : निरोगी राहण्यासाठी 'या' गोष्टी पाण्यात भिजवून खा; काही दिवसांतच फरक जाणवेल
बदामाचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. बदाम एक असा ड्राय फ्रूट आहे ज्याचे स्वतःमध्ये अनेक फायदे आहेत. विशेषतः बदाम रात्री भिजवून सकाळी सेवन केल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदाम रात्री भिजवून सकाळी त्याची साल काढल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होतेच, शिवाय तुमची स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते. बदामामध्ये चांगले फॅट असते जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल, तर भिजवलेली मेथी तुम्हाला मदत करू शकते. यासाठी मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी सर्वप्रथम मेथीचे दाणे पाण्यासोबत घ्यावेत.
यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहील आणि रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहील.
जर तुम्ही पचनाच्या समस्येने त्रस्त असाल किंवा अनेकदा पोटदुखीचा त्रास होत असेल तर रात्री दोन अंजीर पाण्यात भिजवून सकाळी खा.
रात्रभर भिजवलेले अंजीर सकाळी खाल्ल्यास बद्धकोष्ठतेवर मात करता येते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण ओवा, जिरे आणि बडीशेप या तीन गोष्टी घरच्या किचनमध्ये असतात. ज्यामुळे तुमचे वेगाने वाढणारे वजन कमी होऊ शकते. याशिवाय जर पचनाचा त्रास होत असेल तर, ओवा, बडीशेप आणि जिरे हे तिन्ही समप्रमाणात मिसळून एक ग्लास पाण्यात भिजवून घ्या
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.