Happy Birthday Yami Gautam : जाणून घ्या बर्थडे गर्ल यामी गौतमबाबत खास गोष्टी
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आज म्हणजेच 28 नोव्हेंबरला यामी गौतमचा वाढदिवस आहे. यामीनं केवळ चित्रपटातच नाही तर छोट्या पडद्यावर आणि जाहिरातींच्या जगातही खूप नाव कमावलं आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्रीशी संबंधित काही खास गोष्टी...(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिमाचल प्रदेशात यामी गौतमचा जन्म झाला. मात्र तिचं बालपण चंदीगडमध्ये गेलं. 2008साली 'चाँद के पार चलो' या शोमधून तिनं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
यामी गौतम आणि आयुषमान खुराना यांनी 2012साली 'विकी डोनर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत हिट ठरला.
विकी डोनर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणाऱ्या यामीनं त्याआधी कन्नड चित्रपट 'उल्लासा उत्साहा' चित्रपटातही काम केलं आहे.
सौंदर्यानं चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या यामीला एक गंभीर आजार आहे. यामीला केरारोसिस पिलारिस (Keratosis pilaris) नावाचा आजार आहे.
या आजारासंदर्भात यामीनं सांगितलं की, हा त्वचेचा आजार असून यामध्ये त्वचेवर लहान-लहान पुरळ येतं. या आजारावर कोणताही उपाय नाही.
यामी गौतमनं चित्रपट दिग्दर्शक आदित्य धरसोबत रेशीमगाठ बांधली. अगदी साध्या आणि सुंदर पद्धतीनं पार पडलेला यांचा लग्नसमारंभ बरेच दिवस चर्चेचा विषय ठरला. 'उरी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं प्रेम झालं.