Happy Birthday Sanjay Leela Bhansali : देवदास ते बाजीराव मस्तानी; पाहा संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांची यादी
ब्लॅक (2005) (Black): ब्लॅक या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांत्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवदास (2002) (Devdas): देवदास हा शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांचा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटानं पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दहा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या राम लीला या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटामधील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले.
बाजीराव मस्तानी (2015) ( Bajirao Mastani): या रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांनी प्रमुख साकारली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
पद्मावत (2018) (Padmaavat): या चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं नऊ फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले.
संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी, सावरिया आणि गुजारीश यांसारख्या चित्रपटांचे देखील दिग्दर्शन केलं.
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.