Sumangalam Lokotsav : सुमंगलम लोकोत्सवात संत-महंतांचा पर्यावरण रक्षणाचा निर्धार
कोल्हापुरातील कणेरी मठावर सुरू असलेल्या सुमंगलम लोकोत्सवात संताचा मेळा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुमंगलम लोकोत्सवात संत-महंतांनी पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला.
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात केवळ राजकीय, सामाजिक लोकच सहभागी होत नसून देशभरातील संतांनी या पर्यावरणपूरक उत्सवात सक्रीय सहभाग घेतला.
सर्व संत-महंतांनी यावेळी पर्यावरण रक्षणावर सर्वांनी मिळून पर्यावरण आणि पंचमहाभूतांच्या रक्षणाचा कृतीशील निर्धार केला.
यावेळी देशभरातील विविध पंथांच्या संत महंतांचे एकत्रित दृश्य दिसून आले.
सर्व संत-महंतांनी यावेळी पर्यावरण रक्षणावर सर्वांनी मिळून पर्यावरण आणि पंचमहाभूतांच्या रक्षणाचा कृतीशील निर्धार केला.
काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सुमंगलम लोकोत्सवाचे संकल्पना सर्वांसमोर संतांसमोर मांडली.
ते म्हणाले, पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत भारताने चांगले काम केलं आहे.
पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्व मठ आश्रम यांनी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
आश्रमांनी आपल्या परिसरातील शेती अधिकाधिक प्रमाणात सेंद्रिय शेती कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
त्यासाठी शेतकऱ्यांना आश्रम आणि मठांच्या मार्फत देशी गायी दिल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण दिले पाहिजे, देशी वाण टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्व संत महंत यामध्ये सहभागी झाल्यास समाजाला दिशा मिळेल, पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला गती येईल असेही त्यांनी सांगितले.
सुमंगलम लोकोत्सवाचा आजचा पाचवा दिवस आहे.
26 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव असेल.