Heat Wave : अंगाची लाहीलाही होणार! पुढील पाच दिवसात उकाडा वाढणार, हवामान विभागाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांमध्ये तापमानाचा पारा वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (PC : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्येही तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. (PC : istock)
दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेनं विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्या आधीच तापमानात वाढ झाली आहे. (PC : istock)
भारतीय हवामान विभागाकडून गुरुवारी (23 फेब्रुवारी) मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात सामान्यपेक्षा तीन ते पाच अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. (PC : istock)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, भारतात पुढील पाच दिवसात तापमान वाढणार आहे. 24 फेब्रुवारी राजधानीत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. (PC : istock)
अजून मार्च महिना सुरूही झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आता आगामी पाच दिवस वातावरणातील उष्णता आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (PC : istock)
वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात पुढील पाच दिवसात कमाल तापमान हे सामान्यपेक्षा तापमानापेक्षा तीन ते पाच अंशांनी जास्त असणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (PC : istock)
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. (PC : istock)
हवामान विभागाने सांगितलं की, मार्चच्या महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत वायव्य भारतातील काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक वाढू शकतो. (PC : istock)