PHOTO : बेन किंग्जले ते नसरुद्दीन शाह... या अभिनेत्यांनी साकारले 'गांधी'
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने देशभर गांधीजींचं स्मरण केलं जातंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहात्मा गांधी यांची ख्याती एवढी होती की त्यांच्यावर आणि त्यांच्या विचारावर जगभरात अनेक सिनेमे आले.
महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्यांनी अभिनय केला. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून पडद्यावर गांधी साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला.
जे एस कश्यप (JS Cashhyap) यांनी 1963 सालच्या 'नाईन अवर्स टू रामा' या चित्रपटामध्ये महात्मा गांधींची भूमिका केली.
रिचर्ड अटेनबरो यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि 1982 साली प्रदर्शित झालेल्या 'गांधी' (Gandhi) या जगप्रसिद्ध चित्रपटामध्ये गांधींजींची भूमिका ही बेन किंग्जले (Ben Kingsley) यांनी केली होती.
1993 साली प्रदर्शित झालेल्या 'सरदार' (Sardar) या सिनेमात अनू कपूर (Annu Kapoor) यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती.
द मेकिंग ऑफ महात्मा या 1996 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात रजित कपूर (Rajit Kapur) यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती.
'गांधी, माय फादर' या 2007 सालच्या चित्रपटामध्ये दर्शन जारिवाला यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती.
बॉलिवूडचे प्रख्यात अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी 'हे राम' या 2000 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये महात्मा गांधीजींची भूमिका साकारली होती.
गांधी आणि गांधीगिरी या संकल्पनेवर आधारित 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटात मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती.