Taapsee Pannu पासून Vicky Kaushal पर्यंत, बॉलीवुड डेब्यू च्या आधी या कलाकारांनी इंजीनियरिंग केलंय
बॉलीवुडचे खूप पॉपुलर एक्टर्स असे आहेत ज्यांनी एक्टिंग सुरू करण्याआधी इंजीनियरिंगचा अभ्यास पुर्ण केलाय.. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत हे टैलेंटेड एक्टर्स..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतापसी ने गुरु तेग बहादुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून कॉम्पुटर सायन्स या विषयातून इंजीनियरिंग पूर्ण केलंय. फक्त एवढंच नाही तर ती सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून जॉब सुद्धा करत होती.. त्याच दरम्यान तापसी ने काही मॉडलिंग असाइनमेंट सुरू केल्या ज्यांनातर तिने नोकरी सोडून पूर्ण लक्ष एक्टिंगवर केंद्रित केलं..
प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर शाम कौशल यांचा मुलगा विकी कौशलचं नाव सुद्धा या लिस्ट मध्ये येतं. विकीने 2009 साली मुंबई मध्ये राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशनची डिग्री पूर्ण केलीये, परंतु त्यांनेही एक्टिंगला प्राधान्य दिलं
चित्रपट 'प्यार का पंचनामा' पासून गाजलेले अभिनेता कार्तिक आर्यन याने मुंबई डी वाई पाटिल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून बायोटेक्नोलॉजीचा अभ्यास पूर्ण केलाय.. पण त्याचं खरं स्वप्न चित्रपटात काम करणं होतं जे त्याने पूर्ण केलं
अनेक शानदार चित्रपटात काम केलेले आर माधवन ने यांनी कोल्हापुर मधील राजाराम कॉलेज से इंजीनियरिंग मधून शिक्षण घेतलंय.. पण त्यांनी एक्टिंग ट्राय केलं आणि आज त्यांचं नाव आपण सगळे जाणतो..
स्वर्गीय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने सुद्धा इंजीनियरिंग केलं होतं.. तो दिल्ली टेक्निकल यूनिवर्सिटी मधून इंजीनियरिंग करत होता मात्र त्याने ते मधेच सोडलं आणि चित्रपटात नाव कमावलं..