आमीर खानचा दुसरा विवाह मोडल्याचा फातिमा सना शेखवर आरोप; या बॉलिवूड अभिनेत्रींवरही झाले असेच आरोप
बॉलिवूडमध्ये अनेकदा जोड्या बनतात आणि तुटतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना दुसऱ्याचा संसार मोडल्यासारखे गंभीर आरोपांना तोंड द्यावे लागले आहेत. यामध्ये यामी गौतमपासून (Yami Gautam) ते हॉलिवूड अभिनेत्री बार्बरा मोरीपर्यंत (Barbara Mori) नावे आहेत. चला पाहुया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफातिमा सना शेख: नुकताच अभिनेता आमीर खानचा दुसरी पत्नी किरण राव हिच्यापासून घटस्फोट झाला आहे. आमीर आणि किरणची जोडी परस्पर संमतीने 15 वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त झाली आहे. दरम्यान, आमीर खानच्या घटस्फोटाची बातमी समजताच अभिनेत्री फातिमा सना शेख ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. असं म्हणतात की फातिमामुळे आमीर आणि किरण यांचा घटस्फोट झाला.
बार्बरा मोरीः अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानचा 2014 साली घटस्फोट झाला. या घटस्फोटामागे बार्बरा मोरीचा हात असल्याच्या बातम्या आल्या आहेत. होय, खरं तर काईट्स चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हृतिक आणि बार्बरा जवळ आल्याच्या बातम्या आल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिक आणि बार्बराची जवळीक वाढल्यामुळे पत्नी सुझानचे हृतिकबरोबर बरेच वाद झाले होते.
यामी गौतम: अभिनेत्री यामी गौतम हिचा चित्रपट निर्माता आदित्य धर याच्याशी विवाह झाला आहे. मात्र, एकेकाळी यामीचे नाव विवाहित अभिनेता पुलकित सम्राटसोबत बरेच चर्चेत होते. मीडिया रिपोर्टनुसार यामीमुळेच पुलकितचा पत्नी श्वेता रोहिरापासून घटस्फोट झाला.
हेमा मालिनीः बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनीवरही घर तोडल्याचा आरोप आहे. खरं तर, हेमा यांनी धर्मेंद्रच्या विवाहित जीवनात आधीच प्रवेश केला होता आणि धरम पाजीची पहिली पत्नी प्रकाश कौर याबद्दल नाखूष असल्याचे म्हटले जाते.
श्रीदेवी: अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावरही घर तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरं तर श्रीदेवीने बोनी कपूरच्या घरात त्यांची राखी बहीण म्हणून प्रवेश केला होता आणि नंतर बोनीशी लग्न केले. असे म्हटले जाते की संतप्त बोनीची पहिली पत्नी मोना शौरी कपूरने मृत्यूपर्यंत पतीला घटस्फोट दिला नाही.