Rahul Vaidya & Disha Parmar | राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्नाला फक्त हे लोक हजेरी लावणार; पाहा फोटो
राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. पत्रिका छापल्यात, सनई वाजणार आहे, काउंटडाउन सुरू झालंय. घोड्यावर बसण्यासाठी राहुल आणि वधू जोरदार तयारीला लागलेले दिसत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरेदी जोरात सुरू असून राहुल आणि दिशा यांचं संपूर्ण कुटुंबदेखील तयारी पूर्ण करण्यात व्यस्त दिसतंय. त्याचबरोबर दिशा-राहुलच्या लग्नाच्या पाहुण्यांची यादीही तयार आहे. विवाहात कोण-कोण उपस्थित राहणार हे खुद्द वधूवराने फिक्स केलंय. (फोटो - सोशल मीडिया)
दिशा परमार अलीकडेच एका मुलाखतीत लग्नाबद्दल सांगितलं होतं. आपलं लग्न साधं आणि फक्त जवळच्या लोकांमध्येच व्हावे अशी तिची इच्छा आहे. आणि म्हणूनच ते कुटुंबातील खास लोकांच्या उपस्थितीतच लग्नगाठ बांधणार आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
या लग्नात दिशा आणि राहुलच्या कुटुंबासोबत फक्त सात जवळचे लोक हजेरी लावतील. मित्र, इतर नातेवाईक आणि उद्योगाशी संबंधित लोकांना रिसेप्शनमध्ये आमंत्रित केले जाणार आहे. (फोटो - सोशल मीडिया)
राहुल वैद्य खतरों के खिलाडी शो मधून परतल्यानंतर दोघेही बोहल्यावर चढतील अशी चर्चा होती. आता हिच गोष्ट खरी होणार आहे. राहुल नुकताच केपटाऊनहून परतला आहे. आता दोघांनी लग्नाची तारीखही जाहीर केलीय. 16 जुलै रोजी दोघांचे लग्न होणार आहे. तेही वैदिक विधींनुसार. (फोटो - सोशल मीडिया)
आज राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी स्वत: सोशल मीडियावर लग्नपत्रिका शेअर केली. त्यांच्या लग्नाच्या दुसर्या दिवशी म्हणजेच 17 जुलै रोजी खतरों के खिलाडी शो प्रसारित केला जाणार आहे. ज्यात राहुल वैद्य देखील दिसणार आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
दोघांची मैत्री 2018 मध्ये सुरू झाली आणि नंतर हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ आले. बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला प्रपोज केले. आता दोघांच्या लग्नाला केवळ 10 दिवस शिल्लक आहेत. (फोटो - सोशल मीडिया)