Yashasvi Jaiswal IND vs NZ: यशस्वी जयस्वालचा पुणे कसोटीत धमाका, सचिन अन् विराट कोहली जे करु शकले नाहीत ते करुन दाखवलं
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी पुण्यात सुरु आहे. भारतीय फलंदाज पहिल्या कसोटीप्रमाणं दुसऱ्या कसोटीतही अपयशी ठरले. न्यूझीलंडनं भारतावर दुसऱ्या दिवसाअखेर 301 धावांची आघाडी मिळवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताचा पहिला डाव 156 धावांमध्ये आटोपल्यानं न्यूझीलंडला पहिल्या डावातील धावसंख्येंच्या जोरावर 103 धावांची आघाडी मिळाली होती. भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं 30 धावांची खेळी केली. त्यानं या डावात एक विक्रम नावावर केला.
यशस्वी जयस्वालनं पुणे कसोटीत एक विक्रम नावावर केला. जो विक्रम सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली देखील करु शकला नाही. यशस्वीनं एका वर्षाच्या कालावधीत म्हणजेच 2024 मध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या.वयाची 23 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच एका कॅलेंडर वर्षात 1 हजार धावा कसोटीत पूर्ण करणारा यशस्वी जयस्वाल पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
यशस्वी जयस्वालनं पुणे कसोटीतील पहिल्या डावात 60 बॉलमध्ये 30 धावा केल्या. यामध्ये त्यानं चार चौकार मारले.
न्यूझीलंडनं पहिल्या डावात 259 धावा केल्या होत्या. रचिन रवींद्रनं 65 आणि कॉनवेनं 76 धावा केल्या. भारताचा पहिला डाव 156 धावांवर संपला.न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात 5 बाद 198 धावा केल्या आहेत.सध्या न्यूझीलंडकडे 301 धावांची आघाडी आहे.