Dilip Kumar-Saira Banu : वयाच्या 9 व्या वर्षीच सायरा बानो दिलीपकुमारांना हृदय देऊन बसल्या..
बॉलिवूडचे दिग्गज कलाकार दिलीप कुमार यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला. दिलीपकुमार बर्याच दिवसांपासून आजारी होते. दिलीपकुमार (वय 98) यांना 29 जून रोजी श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे त्यांनी आज सकाळी 7.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. सायरा आणि दिलीप कुमारच्या लग्नाला 55 वर्षे झाली आहेत, पण दोघांची बॉन्डिंग खूप चांगली होती. त्यांच्या लग्नाशी संबंधित बर्याच कथा प्रसिद्ध आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसायरा आणि दिलीपकुमारच्या लग्नाची गोष्ट कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. मीडिया रिपोर्टनुसार सायराचे नेहमीच दिलीप कुमारशी लग्न करण्याचे स्वप्न होते आणि हे स्वप्न साकार होईल असे तिला वाटले नव्हते.
स्वतः सायरा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की जेव्हा त्या लंडनमध्ये शिक्षण घेत होत्या तेव्हा त्या 9 वर्षांच्या होत्या. या वयात दिलीपकुमार यांचे चित्रपट पाहून सायरा त्यांच्या प्रेमात पडल्या. तेव्हाच तिने ठरवलं होतं की त्यांना श्रीमती दिलीप कुमार व्हायचं आहे.
सायरा यांनी आपल्या आईकडे ही इच्छा व्यक्त केली होती. त्यावर आईने सांगितले की श्रीमती दिलीपकुमार होण्यासाठी त्यांच्यासारखेच छंद असले पाहिजेत जर दिलीप साहेबांना सितार आवडत असेल तर सितार शिक, उर्दू चांगले बोल.
मोठी झाल्यानंतर सायरा यांनी जेव्हा चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हा तिच्या आईने दिलीपकुमार यांच्या घरासमोरचं मुलीचा बंगला बांधला. सायराच्या वाढदिवशी तिच्या आईने बंगल्यात पार्टी ठेवली होती, ज्यात तिने दिलीपकुमार यांना आमंत्रित केले होते.
दिलीपकुमार पार्टीत आले आणि त्यांनी सायरा यांची भेट घेतली. यानंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. आणि 22 वर्षीय सायराने 44 वर्षीय दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं.