Deepika Padukone Pregnancy : दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट समोर, बाळाच्या जन्मानंतर लगेच 'कल्कि'च्या शूटिंगला परतणार?
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दीपिकाच्या प्रसूतीची तारीख आणि प्रसूती रजा किती काळ चालेल. याबाबतची माहिती समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. दीपिकाची डिलिव्हरी डेट आणि मॅटर्निटी लीव्ह या संबंधित अपडेट्स समोर आले आहेत.
सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर दीपिका पदुकोणच्या डिलिव्हरीची तारीख 28 सप्टेंबरपर्यंत असेल. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली असून मार्च 2025 पर्यंत प्रसूती रजेवर राहणार आहे.
काही जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीर त्यांच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांच्या बाळासाठी ते नवीन घरातही शिफ्ट होण्याच्या तयारीत आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या शेजारी असलेल्या वांद्रे येथील त्यांच्या नवीन लक्झरी अपार्टमेंटमध्ये जाण्याची तयारी करत आहेत.
जर सर्वकाही योग्य पद्धतीने ठरल्यानुसार झालं दीपिका 28 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये बाळाला जन्म देईल. सध्या ती प्रेग्नेंसी पीरियडचा एन्जॉय करत असून त्यासाठी तिने कामातून ब्रेक घेतला आहे.
दीपिकाची प्रसूती रजा पुढील वर्षी मार्चमध्ये संपणार असून त्यानंतर ती लगेच कामावर परतणार आहे.
दीपिका मार्चनंतर कल्कि 2 चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
कल्कि चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दीपिका पदुकोणसह प्रभास , अमिताभ बच्चन आणि कमल हासन हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत.