Deepika Padukone Kalki 2898 AD Pre Release Event : 'कल्कि 2898 AD'च्या इव्हेंटमध्ये 'मॉम टू बी' दीपिकाने वेधले लक्ष, बॉडिकॉन ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप

दीपिका पदुकोणची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचा इव्हेंट नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मॉम टू बी दीपिका पदुकोणने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतीच 'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये हजेरी लावली. त्याआधी तिने एक फोटोशूट केले आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंना तिने कॅप्शन देत म्हटले की, अच्छा ठीक आहे, आता मला भूक लागली आहे.''

दीपिकाच्या या लूक पाहून चाहत्यांनी कौतुक केले आहे. दीपिका आणखीच ग्लॅमरस दिसत आहे.
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या पठाण, जवान आणि फायटर या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटात दीपिकाची भूमिका होती. या चित्रपटांनी एका वर्षाच्या कालावधीत 2550 कोटींहून अधिक कमाई केली.
दीपिका पदुकोण ही 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात दीपिका अॅक्शन भूमिकेत असणार आहे. दीपिकाला अॅक्शन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'कल्कि 2898 एडी'च्या इव्हेंटमध्ये बेबी बम्पसह दीपिका खूपच सुंदर दिसत होती. या कार्यक्रमातील दीपिकाचे फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. दीपिकाने स्टेजवर इतर सहकलाकारांसोबत हजेरी लावली.
'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एका सुपरहिरोवर आधारीत आहे. एका वृत्तानुसार, या चित्रपटाचे बजेट जवळपास 600 कोटी रुपयांच्या घरात आहे. प्रभास, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.