Marathi Serial : 'अंतरपाट'मध्ये पार पडणार गौतमी -क्षितिजचा लग्नसोहळा, पाहा खास फोटो
तुम्ही मालिकेत पाहू शकता की , रश्मी अनपट आणि अशोक धगे म्हणजेच आपले गौतमी आणि क्षितिजचे लवकरच लग्न पार पडणार असून प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौतमी आणि क्षितिज यांच्या लग्नाचा हा अद्वितीय महासप्ताह कलर्स मराठीवर आपल्याला दिसणार असून त्याची सुरुवात देखील झाली आहे.
सांस्कृतिक वैभव जपणारे, परंपराची उजळणी करून देणारे एक साधे सोज्वळ पण तितकेच सुंदर असे लग्न म्हणजे कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' या मालिकेमधल्या क्षितीज आणि गौतमीचे लग्न.
गौतमी- क्षितिज यांचा विवाह विधी एखाद्या हॉलमध्ये न करता अत्यंत सुंदर वेगळेपणा देणाऱ्या वाड्यात पार पडणार आहे.
त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्यांना मोदक ते देखील अस्सल तुपाची धार सोडून देणार. शिवाय हे सगळे जेवण केळीच्या पानात दिले जाणारे आहे आणि या सगळ्यात ऐकायला येतील मराठी लोककलेची लोकगीते जी प्रत्यक्षात लोककलाकार सादर करतील.
याशिवाय रांगोळी, फुलांची सजावट तसेच मराठमोळी संस्कृतीची ओळख असलेले आभूषण आणि येणाऱ्या पाहुण्यांना कोकणचा आनंद मिळावा, म्हणून वेलकम ड्रिंकमध्ये कोकणी शहाळ्याचे पाणी , कोकम सरबत आणि पन्हं दिले आहे.
आजच्या ट्रेडिंगच्या काळात महाराष्ट्राची परंपरा सांगणारी 'अंतरपाट' या मालिकेतील गौतमी - क्षितिज यांचा लग्न सोहळा पाहायला विसरू नका.