Rajinikanth Dadasaheb Phalke Award : रजनीकांत यांचा बस कंडक्टर ते 'सुपरस्टार'पर्यंतचा प्रवास
रजनीकांत यांना 2014 साली 6 तामिळनाडू स्टेट फिल्म अॅवॉर्ड्सने गौरवण्यात आलं. 2000 साली त्यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. 2014 मध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये रजनीकांत यांना अॅवॉर्ड फॉर इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदादासाहेब फाळके पुरस्कार आतापर्यंत चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 50 सेलिब्रिटींना देण्यात आला आहे. यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांच्या नावाची एकमताने शिफारस केली.
रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी परिश्रम व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. दक्षिणेस रजनीकांत यांना थलायवा आणि देव मानलं जातं.
घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रजनीकांत यांनी सुरुवातीच्या काळात बंगळुरु ट्रान्सपोर्ट सर्विसेसमध्ये कंडक्टरची नोकरी केली. मात्र आपल्यात इतरांपेक्षा वेगळी असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यांनी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
त्यानंतर रजनीकांत 1974 साली मद्रास फिल्म इन्स्टिट्युटमध्ये दाखल झाले. कन्नड बोलणाऱ्या रजनीकांत यांनी तमिळ भाषाही शिकली.
रजनीकांत यांनी 1975 पहिला तमिळ चित्रपट 'अपूर्वा रागनगाल' हा होता. या सिनेमात त्यां सपोर्टिंग अॅक्टर म्हणून काम केलं. मुख्य भूमिकेत 'भैरवी' हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट होता. चित्रपट हिट ठरला आणि तिथून रजनीकांत यांचा सुपरस्टार पर्यंतचा प्रवास सुरु झाला.
त्यानंतर‘अंधा कानून’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनय आणि वेगळ्या स्टाईलच्या जोरावर त्यांना लोकांची मनं जिंकली.
रजनीकांत यांच्या स्टाईलने अनेकांना वेड लावलं. त्याची सिगारेट फ्लिप करण्याची स्टाईल, कॉईन उडवण्याच हटके स्टाईल, गॉगल घालण्याची आणि हसण्याची स्टाईल अशा अनेक गोष्टी चाहत्यांच्या मनात घर करुन गेल्या. रजनीकांत यांची स्टाईल केवळ देशातच नव्हे तर परदेशातही कॉपी केली गेली.