Mobikwik IPO : पैसे तयार ठेवा, मोबिक्विकचा आयपीओ 'या' दिवशी खुला होणार, गुंतवणूकदारंना कमाईची मोठी संधी
गुरुग्राममधील फिनटेक कंपनी मोबिक्विकचा आयपीओ 11 डिसेंबरला बोली लावण्यासाठी खुला होईल. या आयपीओसाठी बोली लावण्याची अखेरची तारीख 13 डिसेंबर आहे. या कंपनीची स्थापना बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोबिक्विकनं त्यांच्या शेअरचं मूल्य 265 रुपये ते 279 रुपयांदरम्यान ठेवलं आहे. कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून 572 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे.
मोबिक्विकच्या वापरकर्त्यांची संख्या 16.1 कोटी इतकी आहे. जूनमध्ये कंपनीची उलाढाल 170.7 कोटी रुपये होती. त्यापैकी 50 टक्के उलाढाल वित्तीय सेवांबाबत होती.
कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून वित्तीय सेवांचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न आहे. कंपनी त्यांच्या सेवांची गुणवत्ता वाढवणे याशिवाय हॉर्डवेअर डिवाइसच्या निर्मितीसाठी देखील पैशांचा वापर करेल.
मोबिक्विकच्या आयपीओमध्ये 53 टक्के इक्विटी शेअर साठी अर्ज करता येईल. कंपनी सर्व नवे शेअर जारी करणार असून ऑफर फॉर सेल यामध्ये नसेल. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 75 टक्के, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के कोटा राखीव आहे. कंपनीला 2024 मध्ये 14.08 कोटींचा फायदा झाला होता. कंपनीचा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)