Celina Jaitly: चाहत्यानं सोशल मीडियावर केलं प्रपोज; सेलिना जेटली म्हणाली...
बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सेलिना जेटलीनं (Celina Jaitly) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेलिनानं पीटर हागसोबत लग्न केलं. पीटर आणि सेलिना यांना तीन मुलं आहेत.
ट्विटरवर ट्वीट शेअर करत एका चाहत्यानं सेलिनाला प्रपोज केलं. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सेलिया जेटली, माझी तब्येत ठिक नाहीये. माझी काळजी घ्यायला कोणी नाही.माझी तब्येत आणखी बिघडण्याआधी माझ्याशी लग्न कर. मी घर जावई व्हायला तयार आहे.'
ट्विटरवर सेलिनाच्या एका चाहत्यानं तिला प्रपोज केलं आहे. चाहत्याच्या ट्वीटला सेलिनानं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.
चाहत्याच्या ट्वीटला रिप्लाय देत सलिनानं लिहिलं, 'माझ्या तीन मुलांना आणि माझ्या पतीला विचारुन मी तुम्हाला सांगेल.' सेलिनानं दिलेल्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.
अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर सलिनाच्या या रिप्लायचं कौतुक केलं
सेलिना जेटलीनं ऑगस्ट 2011 मध्ये पीटर हागसोबत लग्न केले.
सेलिना जेटली आणि तिचे कुटुंब ऑस्ट्रेलियात राहते.सेलिना ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
सेलिनाने 'जनशीन', 'नो एंट्री', 'अपना सपना मनी मनी' आणि 'गोलमाल रिटर्न्स'या चित्रपटांमध्ये काम केले आहे.