Celebs Death Threats: अमिताभ बच्चन, सलमान खान ते मुकेश अंबानी.... या सेलिब्रेटिंना आल्या जीवे मारण्याच्या धमक्या
हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अमिताभ यांच्या निवासस्थानी बॉम्बही सापडला होता. त्यामुळे त्यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांना अज्ञात व्यक्तीकडून घरात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाल्याचे समजते.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याही जीवाला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. मुकेश अंबानी आणि अमिताभ बच्चन यांना धमक्या देणाऱ्यांनीच त्यांना धमकी दिली असल्याची माहती आहे.
'सत्यमेव जयते' या टीव्ही शोनंतर सुपरस्टार आमिर खानलाही अंडरवर्ल्डकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे अभिनेत्याने बुलेटप्रूफ कारची व्यवस्था केली.
या यादीत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचेही नाव आहे. एका व्यक्तीने शाहरुखचे घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली होती.
अभिनेता अक्षय कुमारलाही अंडरवर्ल्ड माफिया रवी पुजारीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यानंतर सुपरस्टारला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती.
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सुपरस्टार सलमान खानलाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मॉर्निंग वॉक करताना सलमानचे वडील सलीम यांना धमकीची नोट मिळाली होती.