In Photos : दुबईत धोनीच्या नावाचा रोड, पण का? काय आहे कारण
MS Dhoni : कॅप्टन कूल धोनीचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. धोनीला लांब लांब षटकार मारण्यासाठी ओळखले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधोनीनं टीम इंडियाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. धोनीला जगभरात फिनिशर म्हणून ओळखले जाते.
जागतिक क्रिकेटमध्ये धोनीचा दबदबा होताच... त्याने भारताला टी20, वनडे विश्वचषक जिंकून दिला. त्याशिवाय चॅम्पियन ट्रॉफीही जिंकून दिली आहे. त्याशिवाय आयपीएलमध्येही धोनीचा दबदबा आहे. आयपीएल 2020 मध्ये राजस्थानविरोधात खेळताना अखेरच्या षटकात धोनीने लगावलेला षटकार थेट मैदानाबाहेर गेला होता... जिथं चेंडू पडला त्या जागेला गूगल मॅम्सने धोनी सिक्स असे नाव ठेवलं होतं.
रिपोर्ट्सनुसार, धोनीने षटकार मारण्यापूर्वी या रोडला कोणतेही नाव नव्हते.. पण धोनीच्या षटकारानंतर रोडचे नाव धोनी सिक्स असे ठेवण्यात आले आहे.
धोनीने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 359 षटकार लगावले आहेत. तर 1486 चौकार ठोकले आहेत. त्याशिवाय धोनी खेळपट्टीवर वेगाने धावा घेण्यासही तरबेज आहे.
भारताचा माजी कर्णधार धोनी सध्या आयपीएल 2023 ची तयारी करत आहे. गेल्यावर्षी धोनीच्या संघाची परिस्थिती खूप कराब होती. यंदा जेतेपद पटकावण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरेल.
धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय करअरमध्ये एकूण 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी 20 सामने खेळले आहेत. धोनीने कसोटीत 4876, वनडेमध्ये 10773 आमि टी20 मध्ये 1617 धावा चोपल्या आहेत.